*2 लाख 94 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत विमल गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*2 लाख 94 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत विमल गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
*2 लाख 94 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत विमल गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यात अवैध बनावट दारुची निर्मिती, वाहतूक, साठा, अवैध अग्निशस्त्र, घातक शस्त्र, अंमली पदार्थांची लागवड व साठवणूक, विमल गुटखा इत्यादींबाबत माहिती काढून त्यांचेवर जास्तीत जास्त प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. 2 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला विमल गुटख्याची गुजरात राज्यातून तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील चिनोदा गावात चोरटी वाहतूक होणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील चिनोदा गावात छापा टाकून कल्पेश संजय मराठे वय- 34 रा. चिनोदा ता. तळोदा याच्या ताब्यातून 2 लाख 94 हजार 248 रुपये किमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला व तंबाखु व वाहतूक करण्यासाठी वापरलेला 5 लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण 7 लाख 94 हजार 248 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन तळोदा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, महेश निकम विकास गुंजाळ, मुकेश पवार, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ,
द्यानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार निशीगंध गवळे, सचिन सैंदाणे यांच्या पथकाने केली आहे.



