*न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे पेसा शिक्षक भरती प्रकरण,योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे पेसा शिक्षक भरती प्रकरण,योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
*न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे पेसा शिक्षक भरती प्रकरण,योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
धुळे(प्रतिनिधी):-मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर पेसा शिक्षक भरती प्रकरण योग्य निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश, याचिकाकर्ते बायजा भाग्या वळवी, राहणार बहिरामपाडा, तालुका साक्री, व इतर यांनी सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, तसेच शिक्षण अधिकारी यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे पेसा शिक्षक भरतीतील रिक्त राहिलेल्या दहा पदांवर पात्र उमेदवारांना संधी देऊन न्याय मिळण्याच्या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनावर निर्णय घेण्यासाठी रिट याचिका दाखल केली होती. पेसा अंतर्गत कंत्राटी तत्त्वावरील कार्यमुक्त केलेल्या शिक्षकांची कागदपत्र पडताळणी करून सेवेत सामावून घेण्याबाबतही निवेदन देण्यात आले होते. अनुसूचित क्षेत्रातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत शासन निर्णयचाही संदर्भ देण्यात आला होता. वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. परंतू कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला नव्हता. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर (न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी व न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे) यांनी 31 ऑगस्ट 2026 रोजीच्या न्यायनिर्णयाद्वारे प्रकरणातील सर्व बाबींच्या सखोल विचार करून याचिकाकर्ते यांनी दिलेल्या निवेदनावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी 12 आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केलेले आहेत. याचिकाकर्ते तर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.



