ताजा खबरे:
*देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
*आदिवासी पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या आदिवासी कलाकारांचे,अक्कलकुवा तालुका आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने,सन्मानपत्र देऊन गौरव*
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीर*
*पोषण अभियानांतर्गत मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन*
*क्लस्टरस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात, ढोंगसागाळीच्या एकलव्य विद्यालयाची तिहेरी कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पोषण अभियानांतर्गत मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पोषण अभियानांतर्गत मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन*

  • Share:

*पोषण अभियानांतर्गत मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन*
शहादा(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, जळगाव यांच्या वतीने जिल्हा प्रशासन नंदुरबार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना शहादा व म्हसावद तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आरोग्य व पोषण आहार" विषयावरील त्रिदिवसीय मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा येथील सभागृहात (डोम) मध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटक शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहादा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष माधवी पाटील, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी दीपक गिरासे, तहसीलदार संभाजी पाटील, शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, नगरसेविका ममता पवार आणि केंद्रीय संचार ब्यूरो, प्रबंधक संतोष देशमुख हे प्रमुख पाहुणे तसेच विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे अधिकारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाची प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते चित्रप्रदर्शनीचे फीत कापून व दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी प्रदर्शनीची पाहणी करून विविध माहिती फलक, छायाचित्रे आणि जनजागृतीपर साहित्याची माहिती घेतली. त्यानंतर महाराष्ट्र गीत आणि पोषण अभियानावर आधारित प्रेरणादायी प्रबोधनपर गीत आपकी जय कला पथकाने सादरीकरण केले उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह व गुलाबाचे रोप देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रदर्शनी विविध शाळांचे विद्यार्थी व नागरिकांनी मोठी गर्दी करून मोठा प्रतिसाद लाभला आहे. सेल्फी पॉईंटवर अनेकांना सेल्फी घेण्याच्या तसेच स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करण्याचा मोह आवरता आला नाही या प्रदर्शनी मधून भरडधान्य तसेच आरोग्य व पोषण संदर्भातली विविध माहिती मिळाल्याचे समाधान देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रास्ताविकात संतोष देशमुख यांनी पोषण अभियानाची उ‌द्दिष्टे, कुपोषणमुक्त भारताच्या निर्मितीसाठी शासनाच्या विविध योजना तसेच चित्रप्रदर्शनीच्या माध्यमातून जनजागृतीचे महत्त्व विशद केले.
उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांनी आपल्या मनोगतात, संतुलित आहार, माता व बालकांचे आरोग्य, पोषणाचे महत्त्व आणि नागरिकांनी शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी दीपक गिरासे यांनी, पोषण अभियानही केवळ सरकारी योजना नसून सामाजिक चळवळ असल्याचे सांगितले. नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारून कुपोषण निर्मूलनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी, निरोगी समाजनिर्मितीसाठी पोषण आणि आरोग्य जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित केली. शासन आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातूनच कुपोषणमुक्त भारताचे उ‌द्दिष्ट साध्य होऊ शकते, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी शेठ व्ही. के. शहा विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती पर रॅली काढण्यात येऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आणि कलाकारांचा सन्मान करण्यात आला.उपस्थितांनी पोषण, स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृतीची प्रतिज्ञाही घेतली,
सदर चित्रप्रदर्शनी 1 ते 3 सप्टेंबर 2026 या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुली राहणार असून मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनिल काशिनाथ साळुंके यांनी केले तर आभार प्रदर्शन क्षेत्रीय अधिकारी नाशिक विभागाचे सदाशिव मलखेडकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रदीप प्रदीप पवार, शंकर मोरे, किरण कुमार, प्रिती पवार तसेच मालू वाडेकर यांनी अधिक परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
September, 02 2026
*आदिवासी पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या आदिवासी कलाकारांचे,अक्कलकुवा तालुका आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने,सन्मानपत्र देऊन गौरव*
September, 02 2026
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीर*
September, 02 2026
*पोषण अभियानांतर्गत मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन*
September, 02 2026
*क्लस्टरस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात, ढोंगसागाळीच्या एकलव्य विद्यालयाची तिहेरी कामगिरी*
September, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज