*सर्वच क्षेत्रात आता आदिवासी मुले उच्च पदावर कार्यरत आहेत, हिच खरी समाजाची प्रगतीची वाट-मंत्री नरहरी झिरवाळ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सर्वच क्षेत्रात आता आदिवासी मुले उच्च पदावर कार्यरत आहेत, हिच खरी समाजाची प्रगतीची वाट-मंत्री नरहरी झिरवाळ*
*सर्वच क्षेत्रात आता आदिवासी मुले उच्च पदावर कार्यरत आहेत, हिच खरी समाजाची प्रगतीची वाट-मंत्री नरहरी झिरवाळ*
सुरगाणा(प्रतिनिधी):-मी मंत्री आमदार असलो तरी समाजापुढे मी म्हणजे सर्वस्वी नाही आजपर्यंत आपण सर्वच क्षेत्रात फक्त घेणारे होतो आता देणारे ठरलो आहोत. यावरुन शिक्षण क्षेत्रात समाजाची योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याची जाणीव होते
आदिवासी कोकणी कोकणा समाजाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू असून सर्वच क्षेत्रात आता आदिवासी मुले उच्च पदावर कार्यरत आहेत हिच खरी समाजाची प्रगतीची वाट आहे. असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कोकणी कोकणा गुणवंत सत्कार समारंभात नाशिक नाथकृपा येथे केले. यावेळी व्यासपीठावर मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार मंजुळा गावित,माजी महापौर रंजना भानसी, एन.डी. गावित, हिरामण झिरवाळ
उपजिल्हाधिकारी,कोकणा समाज सेवा संघाचे राज्याध्याक्ष जयवंत गारे, सचिव नामदेव ठाकरे, सहसचिव शिवाजी ठाकरे, कोकणी उपाध्यक्ष चेतन खंबाईत कार्याध्यक्ष चितांमण गायकवाड, विश्वस्त रमेश साबळे, गितेक्ष्वर खोटरे संतोष इंपाळ, सरोज भोये, विमल बागुल, पदमाकर सहारे, किसन ठाकरे, राम चौरे, अशोक बागुल, के. के.गांगुर्डे, विनोद पवार, महेश टोपले, दत्तु पाडवी, मांगिलाल गांगुर्डे, जयराम गावित, दत्तु साबळे, रमेश साबळे, तुषार टोपले, मंगलदास गवळी,परशराम पाडवी, सामाजसेवक रतन चौधरी, आदी उपस्थित होते. यावरुन मार्गदर्शन करताना झिरवाळ म्हणाले की,आज आदिवासी समाज बांधव कृषी क्षेत्रात, कला, क्रीडा, वनक्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन घडविले आहे. मंत्रालयात मी जेव्हा उच्च पदसस्थ व्यक्तींची गावित, चौधरी, भोये, बागुल आदी कोकणा समाजाची नावे ऐकायला मिळतात. आता समाजाला मार्गदर्शन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. वन उपज माध्यमातून वस्तू बनविण्याचे काम सुरू आहे.मुंबई येथील नवरंग कार्यक्रमात आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृतींची देशभरात नव्हे तर जगभरात चर्चा झाली हेच खरे कार्य आहे.विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या तसेच
प्राविण्य मिळवलेल्या उमेदवारांची पार्श्वभूमी परिस्थितीवर मात कशी करुन या पदावर पोहचलेचे मनोगत व्यक्त करायला हवं. यावेळी साक्रीच्या आमदार मंजुळा ताई गावित,माजी महापौर रंजना भानसी, अशोक बागुल, किसन ठाकरे, विलास गवारी आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात समाजाची आगामी काळातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, प्रगतीची दिशा यावर विचारमंथन करण्यात आले.
या गुणगौरव सोहळ्यात शालेय स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी. आदर्श उपक्रमशील शिक्षक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातील यशस्वी मान्यवर, लेखक, कवी, पीएचडी धारक, दहावी, बारावीचे गुणवंत विद्यार्थी, लोकसेवा आयोग, पदोन्नती, वैद्यकीय. अभ्यासक्रम, आदर्श उपक्रमशील शेतकरी, उद्योजक, पत्रकारिता, नृत्य, कलाकार यांना गौरविण्यात आले. यावेळी नंदुरबार, धुळे, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील कोकणी, कोकणा समाजाचे आदिवासी समाज बांधव हजारो संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशराम पाडवी यांनी केले.



