*आमदार आमश्या पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्य सचिवांनी तात्काळ पेसा शिक्षकांना आदेश वितरित करण्याचे आदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आमदार आमश्या पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्य सचिवांनी तात्काळ पेसा शिक्षकांना आदेश वितरित करण्याचे आदेश*
*आमदार आमश्या पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्य सचिवांनी तात्काळ पेसा शिक्षकांना आदेश वितरित करण्याचे आदेश*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदार संघांचे आमदार आमश्या पाडवी, व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सोबत तसेच मुख्य सचिव यांच्या सोबत बैठक पार पडली. यावेळी सध्या राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनावरुन विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आदिवासी आमदारांनी आक्रमक भुमिका घेत शासनाने 5 व 14 ऑगस्ट रोजी काढलेल्या शासननिर्णयाला रद्द करण्याची मागणी केली त्यानुसार 5 व 14 ऑगस्ट रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करण्यात आल्याचे आदिवासी विकास मंत्र्यांनी जाहीर केले. तसेच विद्यार्थी व आमदारांच्या मागणीवरुन 11 नोव्हेंबर 2011 चा शासन निर्णय कायम ठेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे देखील आदिवासी विकास मंत्र्यांनी मान्य केले. तसेच वस्तीगृहात शिक्षण घेण्यासाठी शासनाने वयोमर्यादा तीस वर्ष केली होती ती देखील रद्द करण्यात आली असुन आता पुर्वी प्रमाणे कोणत्याही वयाचे विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेऊ शकतील. तसेच जे विद्यार्थी 10 पास झाल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव त्यांनी दोन वर्ष किंवा त्याहून जास्त कालावधी पासुन 11 वी ला प्रवेश घेतला नसेल तर त्यांचा गॅप शिथिल करुन त्यांना पुढील शिक्षणासाठी वर्गात व वस्तीगृहात प्रवेश देण्यात येईल हा 2013 चा शासन निर्णय देखील लागू करण्यात येणार आहे. या बैठकीत आमदार आमश्या पाडवी यांनी मांडलेल्या विद्यार्थ्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या.
त्यानंतर मुख्य सचिवां सोबत बैठक झाली त्यात 17 संवर्ग पेसा भरती बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 17 संवर्गा पैकी 9 संवर्गाची भरती झाली आहे. कोतवाल आणि पोलीस पाटील हे 2 संवर्गाच्या पदाबाबत न्यायालयात याचिका दाखल आहे. तर 6 संवर्गाची भरती बाकी आहे त्यापैकी आदिवासी विकास विभागाची 1800 शिक्षकांची भरती तात्काळ करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी विकास विभागाची वर्ग -3, व वर्ग -4 ची भरती देखील तात्काळ करण्यात येणार आहे. तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी यांच्या सह 6 संवर्गाच्या भरती बाबत 13 जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सोबत बैठक घेऊन रिक्त पदांची सर्व माहिती घेऊन अजुन 15 दिवसात आदिवासी आमदारां सोबत बैठक घेऊन अधिसंख्य पदाच्या रिक्त जागा देखील भरण्याबाबत कार्यवाही करण्याचे सुतोवाच मुख्य सचिवांनी केले. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील 226 पेसा भरतीतील शिक्षकांना नियुक्ती आदेश दिले जात नव्हते ही बाब देखील आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणून दिली त्यामुळे मुख्य सचिवांनी तात्काळ पेसा शिक्षकांना आदेश वितरित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. विद्यार्थ्यांच्या मागणी प्रमाणे सर्व विषय मान्य करण्यात आले असुन आमदार आमश्या पाडवी यांच्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.



