*‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार’ व ‘स्वयंम’ योजनेचे वेळापत्रक जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार’ व ‘स्वयंम’ योजनेचे वेळापत्रक जाहीर*
*‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार’ व ‘स्वयंम’ योजनेचे वेळापत्रक जाहीर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या घटकांतील उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि शासकीय वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ व ‘पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना’ अंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या योजनेअंतर्गत 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व बिगर- व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://hmasnew.mahait.org/ भेट देऊन विहित वेळेत आपले अर्ज दाखल करावेत, असेही आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक वसावे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



