ताजा खबरे:
*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
*सीएस‌एमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
*नंदुरबार येथे 31 ऑगस्ट रोजी 'भटके विमुक्त दिवस' साजरा होणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा;जनसंपर्काला केली दमदार सुरुवात*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा;जनसंपर्काला केली दमदार सुरुवात*

  • Share:

*माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा;जनसंपर्काला केली दमदार सुरुवात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आठ महिन्यांच्या आजारपणातून उठल्यानंतर महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सर्वात प्रथम 25 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री शनैश्वर मंदिरात जाऊन  मनोभावे शनि देवाचे विधिवत पूजन केले. त्यांना असे सक्रिय झालेले पाहून मोठ्या संख्येने जमलेले ग्रामस्थ आणि कार्यकर्ते अत्यंत आनंदित व उल्हासित झालेले दिसले. आजारपणाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार येथे दाखल होताच जनसंपर्क करण्याला पुन्हा दमदारपणे सुरुवात केली असून शनिमांडळ येथील ही त्यांची पहिली भेट होती. बंगल्यावर भेटीला येणाऱ्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी संवाद सुरू केला आहे. शनिमांडळ येथील श्री शनैश्वर मंदिरात सर्वप्रथम डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसेच भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते शनि देवाचे विधीवत पूजन करण्यात आले. तसेच महाआरती करण्यात आली. त्यानंतर शनेश्वर मंदिरा समोरील मारुती मंदिराच्या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी विकास मंत्री असताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मंजूर केलेल्या निधीतूनच या सभामंडपाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. यादरम्यान, ट्रस्टच्या कार्यालयात बसून उपस्थित ग्रामस्थांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याशी संवाद केला. आपल्या मार्गदर्शक नेत्याला सक्रिय झालेले पाहून अनेकांनी जनता आपल्या सोबतच आहे; असे आश्वस्थ केले व उत्स्फूर्तपणे घोषणा देत आनंद व्यक्त केला. याप्रसंगी शनैश्वर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील, माजी जि प सदस्य भिका भाना पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, शनिमांडळ सरपंच विनायक पाटील, माजी चेअरमन विश्वास पाटील, भाईदास सावंत वसंत खैरनार, भरत राजपूत, रमेश धोबी, चिंधू धनगर, शिवाजी पाटील, प्रभाकर पाटील, राजेंद खैरनार, भटू धनगर, प्रकाश भिल, विवेक पाटील, योगेश पवार, जगदीश पाटील, महेंद्र राजपूत, सचिन पाटील, भावराम भिल, राकेश मोरे, छोटू ठाकरे, विखरणचे सरपंच रोहिदास मराठे, होळचे सरपंच व्यंकट पाटील, सरपंच लोटन पाटील, नारायण राजपूत, संजय पाटील, माजी सरपंच विजय राजपूत, रनाळे सरपंच जितू ओगले, हेमंत पटेल, राहुल पाटील, अक्षय पाटील आणि अन्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
August, 25 2026
*सीएस‌एमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
August, 25 2026
*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
August, 25 2026
*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
August, 25 2026
*नंदुरबार येथे 31 ऑगस्ट रोजी 'भटके विमुक्त दिवस' साजरा होणार*
August, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज