*रघुवंशी समाजातर्फे वृक्षारोपण, हरित अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,मेघा रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रघुवंशी समाजातर्फे वृक्षारोपण, हरित अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,मेघा रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण*
*रघुवंशी समाजातर्फे वृक्षारोपण,हरित अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,मेघा रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय समाजातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि समाजात वृक्षलागवडीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, मेघा रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात विविध प्रजातींच्या 111 रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या प्रत्येक रोपाची नियमित देखभाल व संवर्धन करण्याचा संकल्पही करण्यात आला.
कार्यक्रमास माजी शिक्षण समिती सभापती विलास रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष राजेश रघुवंशी, वनविभागाचे सेवानिवृत्त अधिकारी मनोज रघुवंशी, ढेकवद फ्रुट कमिटीचे चेअरमन सचिन रघुवंशी,समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच युवक-युवती आणि महिलांची उपस्थिती होती. पर्यावरणाचे रक्षण, स्वच्छ परिसर आणि हरित नंदुरबार या उद्देशाने अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
रघुवंशी समाजाच्या या उपक्रमातून समाजबांधवांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन केले.



