*प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन; कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उत्साहात केले स्वागत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन; कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उत्साहात केले स्वागत*
*प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन; कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उत्साहात केले स्वागत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने सलग आठ महिने गंभीर आजारपणाशी झुंज दिल्यानंतर 24 ऑगस्ट 2026 रोजी त्यांचे नंदुरबार येथे आपल्या जन्मभूमीत आगमन झाले. दीर्घ प्रतिक्षेनंतर ते नंदुरबार येथे सुखरूप परतलेले पाहून त्यांच्या निवासस्थानी भेट देणाऱ्या चाहत्यांमध्ये, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये मोठे उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण पहायला मिळाले.
जानेवारी 2026 अखेर हृदयविकारामुळे माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना नासिक येथील किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले होते. बायपास सर्जरी नंतर प्रकृती सुधारली होती. परंतु पुन्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबई येथील रिलायन्स समुहाच्या रुग्णालयात हलवणे भाग पडले होते. या सर्व काळात डॉक्टर सौ. कुमुदिनी गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी पाठ पुजा आणि नवस ठेवणे चालवले होते. अनेक गावातील कार्यकर्त्यांनी चाहत्यांनी प्रार्थना करणे सुरू ठेवले होते. त्यादरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचप्रमाणे पक्षातील अनेक वरिष्ठ मान्यवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील वरिष्ठ मान्यवर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली होती. आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आणि शुभकामना व्यक्त करण्यासाठी नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा भेट देत होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज डॉक्टर विजयकुमार गावित हे स्वतः मुंबईतून प्रवास करून नंदुरबार येथे उपस्थित झालेले पाहून कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांच्या निवासस्थानी आगमन झाले त्याप्रसंगी फुलांचा वर्षाव करून आणि पंचारती ओवाळून गावित परिवारातील सर्व सदस्यांनी स्वागत केले. त्यांची भेट घेऊन शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर शहरातील नगरसेवक, मान्यवर पदाधिकारी, शैक्षणिक सांस्कृतिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांची रांग लागली होती.



