*आमदार आमश्या पाडवी यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीतर्फे,विविध प्रलंबित प्रश्नाबाबत समन्वय समितीचे निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आमदार आमश्या पाडवी यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीतर्फे,विविध प्रलंबित प्रश्नाबाबत समन्वय समितीचे निवेदन*
*आमदार आमश्या पाडवी यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीतर्फे,विविध प्रलंबित प्रश्नाबाबत समन्वय समितीचे निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव या दोन तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आमश्या पाडवी यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने, विविध प्रलंबित प्रश्नाबाबत समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अक्कलकुवा येथे निवासस्थानी जाऊन निवेदन देऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ग्रॅज्युईटी अदा करण्यात यावी, पेन्शन योजना लागू करावी. फेडरेशन कडून येणारा आहार चांगला दर्जाचा देण्यात यावा, प्रोत्साहन भत्ता सरसकट मानधनासोबत देण्यात यावा,
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समाधानकारक मानधन वाढ देण्यात यावी.
पर्यवेक्षकांची रिक्त पदे अंगणवाडी सेविकांमधून लवकर भरण्यात यावी या प्रश्नांबाबत निवेदन देऊन आमदार साहेबांसोबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली सदर मागण्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्यात येईल व स्वतः शिष्टमंडळाचे नेतृत्व मी करेल असे आमदार आमश्या पाडवी यांनी शिष्टमंडळाला सांगितले यावेळी निमंत्रक युवराज बैसाणे, राजू पाटील, अमोल बैसाणे, समाधान बोरसे, वकील पाटील उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील प्रकल्प प्रमुख बीट प्रमुख उपस्थित होते.