*वैभव विद्यालय,वैजाली येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वैभव विद्यालय,वैजाली येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण संपन्न*
*वैभव विद्यालय,वैजाली येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, वैभव विद्यालय, वैजाली ता.शहादा जि. नंदुरबार येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण संपन्न. वैभव विद्यालय, वैजाली येथे पर्यावरण संवर्धनासाठी गावातून वृक्षदिंडी काढून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासोबतच झाडे लावा झाडे जगवा, एक पेड माँ के नाम अशा विविध घोषणा देऊन पर्यावरणाविषयी जनजागृती केली व शाळेचे मुख्याध्यापक डी एस माळी यांनी शाळेत आवारात विद्यार्थ्यांच्या मदतीने अनेक झाडं लावली व ती झाडे जगवण्याचा संकल्प शाळेतील विद्यार्थ्यांनी केला. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जी. पी.पाटील, भोई, एस के पाटील, ए आर शेख, एस एस शिंपी, पी एस पाटील, अमोल चौधरी, एस.बी. परदेशी, श्रीमती एस आर पाटील, श्रीमती एस.ओ. जयस्वाल, व्ही ए पाटील, जी एस पाटील, आर बी पवार यांनी परिश्रम घेतले.



