*स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे दर निश्चित, अधिक शुल्क आकारले जात नसल्याचे पालिकेचे स्पष्टीकरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे दर निश्चित, अधिक शुल्क आकारले जात नसल्याचे पालिकेचे स्पष्टीकरण*
*स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे दर निश्चित, अधिक शुल्क आकारले जात नसल्याचे पालिकेचे स्पष्टीकरण*
नंदुरबार(प्रतिनिधी):–शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या देखभाल, दुरुस्ती व संचालनासाठी आकारण्यात येणाऱ्या विविध शुल्कांचे दर निश्चित करण्यात आले असून, निश्चित दरापेक्षा अधिक शुल्क नागरिकांकडून घेतले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. याबाबत पालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जलतरण तलावासाठी निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार कुटुंब- पती व पत्नी तसेच 18 वर्षांखालील दोन मुलांसाठी वार्षिक सभासद शुल्क 15 हजार रुपये, प्रौढांसाठी वार्षिक सभासद शुल्क 7 हजार रुपये, तर लहान मुलांसाठी 5 हजार रुपये आहे. मासिक प्रवेश शुल्क प्रौढांसाठी 1 हजार 500 रुपये, तर लहान मुलांसाठी 1 हजार 300 रुपये निश्चित करण्यात आले आहे. तसेच प्रवेश शुल्क प्रति वर्ष 300 रुपये, नूतनीकरण शुल्क वार्षिक 1000 रुपये व मासिक 80 रुपये, नुकसान भरपाई दंड 500 रुपये, ओळखपत्राची दुसरी प्रत 100 रुपये, चाचणी शुल्क 100 रुपये असे दर निश्चित आहेत. आकस्मिक तिकिटासाठी प्रौढ व लहान मुलांसाठी प्रति तास 82 रुपये, वार्षिक/मासिक सभासद प्रवेश अर्जासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. चित्रिकरणासाठी एक तासाकरिता 8 हजार रुपये, तर चित्रपट (हिंदी/मराठी) चित्रिकरणासाठी प्रति दिन 12 हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धा (शासकीय/निमशासकीय/निवड चाचणी) तीन तासांकरिता 5 हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. जलतरण तलावाच्या शुल्काबाबत नागरिकांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये यासाठी अधिकृत दरपत्रक जाहीर करण्यात आले असून, दरपत्रकात नमूद केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात नाही असे नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत दरानुसारच शुल्क भरावे आणि अतिरिक्त शुल्काची मागणी झाल्यास संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मंजूर दर हे जीएसटी वगळून आहेत.



