*जामिया कॉलेज ऑफ लॉ येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जामिया कॉलेज ऑफ लॉ येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले*
*जामिया कॉलेज ऑफ लॉ येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थ व विविध प्रकारच्या व्यसनांमुळे होणारे हानिकारक परिणाम याबाबत जागृती निर्माण करणे तसेच निरोगी व व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमास एल.एल.बी.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. साजिद पिंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसनाधीनते चे सामाजिक, शारीरिक, मानसिक तसेच कायदेशीर परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून आपल्या सहकाऱ्यांमध्ये व समाजामध्ये व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. यावेळी पुष्पलता बाराह्मे यांनी ‘नशामुक्त भारत अभियान’ या विषयावर माहितीपूर्ण व प्रभावी व्याख्यान दिले. त्यांनी व्यसनमुक्तीसाठी प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती, युवकांची भूमिका आणि व्यसनमुक्त समाजनिर्मिती साठी सामूहिक जबाबदारी यांचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे समन्वयक साबीर शेख यांनी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय केले. त्यांनी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. फरहीन मोहम्मद खान आणि पंकज पावरा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संक्षिप्त मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्रा. साजिद शेख, तसेच महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामां बाबत सतर्क राहण्याचा, निरोगी जीवन शैलीचा स्वीकार करण्याचा तसेच ‘नशामुक्त भारत अभियान’ अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचा संदेश देण्यात आला. व्यसनमुक्त भारत आणि व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी असा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.



