*अन्न व औषध प्रशासनाचा नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईचा बडगा;दोघांचे परवाने रद्द,एकावर गुन्हा दाखल!तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यातील आस्थापनांवर मोठी कारवाई*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अन्न व औषध प्रशासनाचा नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईचा बडगा;दोघांचे परवाने रद्द,एकावर गुन्हा दाखल!तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यातील आस्थापनांवर मोठी कारवाई*
*अन्न व औषध प्रशासनाचा नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईचा बडगा;दोघांचे परवाने रद्द,एकावर गुन्हा दाखल!तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यातील आस्थापनांवर मोठी कारवाई*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील अन्न आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अचानक तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तळोदा येथील एका पेढीचा परवाना रद्द करण्यात आला असून, नवापूर येथील चिकन बिर्याणी सेंटरचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच शहादा तालुक्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. तपासणीत उघडकीस आल्या गंभीर त्रुटी:तळोदा येथे मुदत संपलेली उत्पादने (Expired Products): तळोदा येथील एका अन्न विक्री पेढीची अचानक तपासणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळून आली, तसेच मुदत संपलेली उत्पादने (Expired Products) विक्रीसाठी ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या पेढीचा परवाना तात्काळ रद्द करण्यात आला आहे. नवापूरमध्ये अस्वच्छतेप्रकरणी बिर्याणी सेंटर निलंबित: नवापूर येथील कचेरी रोड परिसरातील एका चिकन बिर्याणी सेंटरमध्ये अन्नपदार्थ अत्यंत अस्वच्छ व असुरक्षित वातावरणात तयार केले जात असल्याचे आढळल्याने सदर आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. शहादा तालुक्यात गुटखा साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल: शहादा तालुक्यातील वडाळी येथील ‘मामाजी ट्रेडर्स’ येथे महाराष्ट्रामध्ये बंदी असलेल्या गुटखा व पानमसाल्याचा साठा विक्रीसाठी केल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली असून संबंधितांवर सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही- तुकाराम मुंढे या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बोलताना अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंढे (भा.प्र.से.) यांनी स्पष्ट केले की, "जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात सहन केला जाणार नाही. भेसळ किंवा गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई केली जाईल." नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन:
जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा मानके व नियमांचे काटेकोर पालन करून स्वच्छ व सुरक्षित वातावरणात व्यवसाय करावा तसेच नागरिकांना कोणत्याही अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका असल्यास त्यांनी स्वतःचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि संबंधित आस्थापनेच्या अचूक पत्त्यासह अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहनही अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (अन्न) श्रीमती गोडसे पाटील यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



