*कोळंब शाळेत पुन्हा वाय-फाय सेवा सुरू कोळंबेश्वर युवा मंडळा'च्या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाला बळ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोळंब शाळेत पुन्हा वाय-फाय सेवा सुरू कोळंबेश्वर युवा मंडळा'च्या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाला बळ*
*कोळंब शाळेत पुन्हा वाय-फाय सेवा सुरू कोळंबेश्वर युवा मंडळा'च्या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाला बळ*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील कोळंब हे छोटेसे गाव आजही इंटरनेटसारख्या आधुनिक सोयी -सुविधांपासून काहीसे दूर आहे. असे असूनही येथील ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वामुळे आणि तळमळीमुळे गावातील शाळा व विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने यश मिळवत आहेत. याच शैक्षणिक वाटचालीला मोलाचा हातभार लावत 'कोळंबेश्वर युवा मंडळा'ने शाळेच्या बंद पडलेल्या वाय-फाय (Wi-Fi) इंटरनेट सेवेचे पुढील वर्षाचे बिल भरून ही सुविधा पूर्ववत सुरू केली आहे.
कोळंब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेसाठी पूर्वी वाय-फाय कनेक्शनची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, सुमारे 7 हजार रुपयांचे वार्षिक बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने गेली एक वर्ष ही महत्त्वाची सुविधा बंद पडली होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणात अडथळा निर्माण झाला होता. ही बाब 'कोळंबेश्वर युवा मंडळा'च्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने बैठक घेऊन या बिलाची सर्व रक्कम स्वतः भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 14 ऑगस्टपासून शाळेत वाय-फाय इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाली आहे. दुर्गम भागात राहूनही विद्यार्थ्यांना जगाशी जोडणाऱ्या आणि नव्या ज्ञानाच्या वाटा खुल्या करून देणाऱ्या या निर्णयामुळे परिसरातून मंडळाचे कौतुक होत आहे.
या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश सुतार, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष सीताराम पाटेकर, मुख्याध्यापक जयेश तेलंग तसेच शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीने कोळंबेश्वर युवा मंडळाची कार्यकारिणी, सल्लागार, तसेच मुंबई व गावातील सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. भविष्यातही शाळेच्या प्रगतीसाठी असेच निरंतर सहकार्य लाभत राहील, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.



