*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोप स्किपिंग स्पर्धेत दैदिप्यमान यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोप स्किपिंग स्पर्धेत दैदिप्यमान यश*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोप स्किपिंग स्पर्धेत दैदिप्यमान यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-द्रोणाचार्य स्पोर्ट्स क्लब, नंदुरबार आणि रोप स्किपिंग असोसिएशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 12 वी नंदुरबार जिल्हा रोप स्किपिंग चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत के.आर. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
ओरिझोन बँक्वेट हॉल, (कोरीट नाका), नंदुरबार येथे उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत बाऊन्सर, जॉगिंग स्पीड, डबल अंडर, फ्रीस्टाइल, टीम रिले आदी विविध प्रकारांचा समावेश होता. के.आर. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य, वेग, शिस्त आणि सांघिक भावनेचे दर्शन घडवत प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले. विद्यार्थ्यांना प्रशिक्षक दिपेश गायकवाड व दर्शन यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी, उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी, संचालिका श्रीमती केतकी वाणी, प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.
या स्पर्धेत कु. जान्हवी वसावे हिने कर्णधार म्हणून उत्कृष्ट नेतृत्व केले. तसेच स्मिता वसावे, दिव्या बागुल, तनुश्री भामरे, शगुन मोदाणी, याशिका मोदाणी, रुहीका वसावे, सृष्टी सोनार, वृशाली गवळी, गर्विता पटेल, अथर्व मराठे, कौशल कोळी, चैतन्य पाटील, परिधी पटेल, श्रेया भोजगुडे, ऋद्धी चौधरी आदी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली. या यशाबद्दल शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, उपप्राचार्य तसेच पालकवर्गाने आनंद व्यक्त करून सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



