*'व्यसनमुक्ती व विद्यार्थ्यांची भूमिका' यावर श्रीमती ही. गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये मार्गदर्शन सत्र*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*'व्यसनमुक्ती व विद्यार्थ्यांची भूमिका' यावर श्रीमती ही. गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये मार्गदर्शन सत्र*
*'व्यसनमुक्ती व विद्यार्थ्यांची भूमिका' यावर श्रीमती ही. गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये मार्गदर्शन सत्र*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भाग्यचैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नंदुरबार संचलित आनंदवन व्यसनमुक्ती उपचार व मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि श्रीमती ही. गो. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘व्यसनमुक्ती व विद्यार्थ्यांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बागुल होते.
यावेळी नितीन मधुकर सनेर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगत व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यसनांना नकार देऊन स्वतः बरोबरच समाजालाही व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले. शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. सीमा पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शाळेचे उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षक सुनील शाह, आनंदवन व्यसनमुक्ती उपचार व मार्गदर्शन केंद्राचे समुपदेशक लक्ष्मण बागुल तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल दराडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन देविदास पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन हेमंत लोहार यांनी केले. मार्गदर्शन सत्राच्या समारोपावेळी प्रमुख मार्गदर्शक नितीन सनेर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संकल्प केला.



