*प्रवासी वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी 'धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ', नोंदणी करण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रवासी वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी 'धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ', नोंदणी करण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन*
*प्रवासी वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी 'धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ', नोंदणी करण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील ऑटो-रिक्षा, टॅक्सी, कॅब आणि इतर सर्व प्रवासी वाहन चालकांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाने पूर्वीच्या मंडळाचे नाव बदलून आता ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ असे केले असून, याच्या नियमावलीतही मोठे व महत्त्वाचे बदल करण्यात आले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या सुधारित निर्णयामुळे आता सर्व परवानाधारक व बॅजधारक प्रवासी वाहन चालकांना या कल्याणकारी मंडळाचे सदस्य होता येणार आहे. चालकांच्या कल्याणासाठी एक स्वतंत्र निधी उभारण्यात येणार असून, यामध्ये ओला, उबर सारख्या ॲग्रीगेटर कंपन्यांकडून प्रत्येक राईडवर जमा होणारी कल्याणकारी रक्कम वर्ग केली जाणार आहे.
ऑनलाईन नोंदणी बंधनकारक: या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चालकांनी शासनाच्या https://ananddighekalyankarimandal.org/home या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया:
नोंदणीसाठी चालकाचे पॅन कार्ड (PAN Card), वैध ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License), बॅजची माहिती व इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतील. अर्ज भरल्यानंतर ओळखपत्र शुल्क भरणे बंधनकारक असेल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर चालकांना अधिकृत ओळखपत्र दिले जाईल, ज्याद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ घेता येईल. प्रवासी वाहन चालकांची सामाजिक व आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे सदस्यत्व अत्यंत महत्त्वाचे असून, जिल्ह्यातील सर्व पात्र परवानाधारक चालकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती दुतोंडे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



