*जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन
*जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन करण्यात आले. नंदुरबार येथील ऐतिहासिक मोठा मारुती मंदिर सभागृहात पुजारी विलासराव जोशी यांच्या उपस्थितीत कॅमेऱ्याचे विधिवत आणि मंत्रोपचाराने पूजन करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा प्रेस फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, कोषाध्यक्ष सुनील कुलकर्णी सचिव सूर्यकांत खैरनार यांच्यासह जेष्ठ फोटोग्राफर रमेश पटेल शांताराम पाटील यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी फोटोग्राफी दिनाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, सन 1839 मध्ये फ्रान्स देशात 19 ऑगस्ट रोजी फोटोग्राफी पेटंट सार्वजनिक केले. तेव्हापासून 19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर गेल्या 187 वर्षात फोटोग्राफि क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी छायाचित्रण दिनाचे महत्त्व सांगितले.
छायाचित्र पूजन
कार्यक्रमाप्रसंगी महादू हिरणवाळे, प्रशांत पाटील, अमित कापडणे, निलेश चौधरी, प्रशांत जोशी, विशाल हिरणवाळे, तसेच जयंत माळी, भास्कर मराठे, संकेत गुरव, उपस्थित होते.



