*दहा वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या मान्य करा, अन्यथा पुढील आंदोलन मंत्र्यांच्या बंगल्यासमोर-अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दहा वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या मान्य करा, अन्यथा पुढील आंदोलन मंत्र्यांच्या बंगल्यासमोर-अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई*
*दहा वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या मान्य करा, अन्यथा पुढील आंदोलन मंत्र्यांच्या बंगल्यासमोर-अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई*
बेलापूर(प्रतिनिधी):-प्रवासी संघटनेच्या मागील 10 वर्षाच्या विविध मागण्यांच्या निषेधार्थ 15 ऑगस्ट रोजी कोकण रेल्वेचे मुंख्यालय बेलापूर येथे अध्यक्ष शेखर बागवे यांच्या नेतृत्वात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मागण्यांसंदर्भात प्रवासी संघटनेची कोकण रेल्वे प्रशासनासोबत मिटींग होऊनही काहीही निष्पन्न न झाल्याने प्रवासी संघटना आपल्या निर्णयावर ठाम राहीली त्यांनी कोकण रेल्वेसमोर वारंवार उपोषण करूनही काही मिळणार नसेल तर पुढील आंदोलन नेत्यांच्या बंगल्याच्या समोर केले जाईल असे बागवे यांनी सांगितले. प्रवासी संघटनेच्या विविध मागण्यांमध्ये वसई सावंतवाडी पॅसेजर, कल्याण सावंतवाडी पॅसेंजर, दादर रत्नागिरी इंटरसिटी एक्स, मुंबई चिपळूण मेमू तर सावंतवाडी टर्मिनस, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, रेल्वेचे दुहेरी करण, सुपर फास्टला जादाचे हॉल्ट, रेल्वे स्टेशनवर छप्पर अशा अनेक मागण्यांसाठी प्रवासी संघटनेने लाक्षणिक उपोषण केले होते. उपोषणाच्या प्रथम प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी कोकण रेल्वे प्रशासनासोबत झालेल्या मिटींगची उपस्थितांना माहीती दिली. मागण्यांसंदर्भात रेल्वे प्रशासनाने हात वर केल्याने ना विलाजास्तवर प्रवासी संघटनेला हे उपोषण करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवासी संघटनेने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गणपती आगमनापूर्वी 4 दिवस पहिले मुंबईतून कोकणाच्या दिशेने तर गौरी गणपती विसर्जन व अनंत चतुर्दशीनंतर 2 दिवस कोकणातून जादा रेल्वे सोडल्यास कोकणवासियांचे गणपतीचे बऱ्यापैकी प्रश्न सुटतील मात्र रेल्वे तसे करत नाही. कोकण रेल्वे प्रशासनाने या वर्षी तर जादा गणपती स्पेशलचा कसा फज्जा उडवला यावर अनेकांनी आपल्या मनोगता मध्ये नाराजी व्यक्त केली तर यावर्षी सिंघुदुर्गापेक्षा रत्नागिरी जिल्हाला जास्त रेल्वे दिल्याने तळकोकणातील चाकरमन्यांनी गावाला जायचे कसे?असा सवाल उपस्थित केला.
यावेळी शेखर बागवे, यशवंत जडयार, गणेश चव्हाण रवींद्र हांडे, निलेश ठोंबरे, राजेश परब, शरद घाटये, जनार्दन गावडे, दत्ताराम बांबरकर, सुभाष करपे, चंद्रकांत सागवेकर, दिलीप बेलकर, विश्वास सावंत, विठ्ठल घाडी, संतोष केळकर, अजय विश्वासराव, रंजन पाळेकर, महेश माधव,दिनकर नांदोस्कर, सुभाष लाड, प्रकाश चव्हाण, सुरेंद्र पवार, संतोष पाटणे, रमेश सावंत, प्रकाश पवार, श्रीविद्या सरवणकर, मुकेश गावडे, अनिल मोरे, बाळ वेळकर, संजय देसाई, रमेश शिगवण, सुरेश गुरविद्याधर बांदकर, समीर धुरी, सुभाष जाधव, प्रभाकर चिबडे, अभिषेक सावंत, एकनाथ चव्हाण,सौ.संगीता हांदे, रुपेश दर्गे अशा अनेक उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.



