*राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये उत्साहात आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये उत्साहात आयोजन*
*राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये उत्साहात आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी, महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाच्या अध्यक्ष सौ. योगिता गणेश पाटील तसेच सचिव गणेश गोविंद पाटील यांनी राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व शिक्षक, ग्रंथालय कर्मचारी व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाचा विस्तार व्हावा आणि शैक्षणिक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी ज्ञानवर्धक व उपयुक्त पुस्तके भेट दिली. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अधिक ज्ञान मिळण्यास तसेच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान ग्रंथालयाचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत ग्रंथालयाची भूमिका आणि नियमित वाचनाचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात उत्साहात पार पडला.
“वाचनातून ज्ञान, ज्ञानातून प्रगती!”



