*विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने तलवाडे खुर्द येथे उत्साहात शोभायात्रा!*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने तलवाडे खुर्द येथे उत्साहात शोभायात्रा!*
*विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने तलवाडे खुर्द येथे उत्साहात शोभायात्रा!*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आज विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने तलवाडे खुर्द येथे आयोजित शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने एकत्र आले. शोभायात्रेला सुरुवात होण्यापूर्वी भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला व मूर्तीला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक विजय होडगर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संतोष महाराज धनगर, तलवाडे खुर्दचे माजी उपसरपंच रमेश मोरे, भारतीय किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलास धनगर, समाजसेवक किरण माळी, योगेश मोरे, नॅशनल धोबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र कपडे", माजी उपसरपंच भाऊराम भील, मंगलसिंग भील, समाजसेवक जतन भील तसेच असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून शोभायात्रा जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. एकता, संस्कृती आणि आपल्या हक्कांच्या जाणीवेचा संदेश देत विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.



