*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-2026,जिल्ह्यातील 10 हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-2026,जिल्ह्यातील 10 हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-2026,जिल्ह्यातील 10 हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना -2026 च्या प्रभावी व गतीमान अंमलबजावणीसाठी 6 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची पहिली आढावा बैठक संपन्न झाली, असल्याची माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे, सहायक निबंधक राजकुमार राठोड (नंदुरबार), गिरीश महाले (शहादा), व सागर गवंड (नवापूर) समिती सदस्य, विविध बँकांचे प्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व सद्यस्थिती: ई- केवायसी प्रगती: नंदुरबार जिल्ह्यातील 10 हजार 470 पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम: उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्यासाठी बँका, आपले सरकार सेवा केंद्रे (CSC) आणि सहकार विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. तक्रार निवारण: पोर्टलद्वारे समितीकडे एकूण 68 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - 44 व राष्ट्रीयीकृत बँका - 24). यामध्ये माहिती असहमत किंवा खाते क्रमांक असहमती यांसारख्या तक्रारींचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश: या सर्व तक्रारींचा तातडीने व वेळेत निपटारा करण्याचे निर्देश संबंधित बँक समन्वयकांना देण्यात आले आहेत. योजनेचा लाभ विनाविलंब व वेळेत मिळण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली ई- केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक पुरी यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले. आहे.



