*नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित वैभव विद्यालय,वैजाली येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित वैभव विद्यालय,वैजाली येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा*
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित वैभव विद्यालय,वैजाली येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-वैभव विद्यालय, वैजाली येथे आदिवासी गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी एस माळी, तर प्रमुख वक्ते म्हणून एस.के. पाटील हे होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा, तंट्या मामा भिल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, आदिवासी जीवनावर नाटिका, आदिवासी संस्कृतीवर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षांनी आपल्या भाषणात आदिवासी संस्कृतीला उजाळा दिला तसेच प्रमुख वक्त्यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन पी.एस. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जि. पी.पाटील, ए. आर. शेख, एच. आर. भोई, एस. एस. शिंपी, एस. बी.परदेशी, ए.एस. परदेशी, श्रीमती एस. आर. पाटील, श्रीमती एस. ओ. जयस्वाल, विनोद पाटील, गणेश पाटील, रमेश पवार, यांनी सहकार्य केले.



