*एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात*
*एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एस.ए.एम. ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूल, नंदुरबार येथे जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आदिवासी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य पराग पोळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक सबस्टीन जयकर उपस्थित होते. यावेळी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षिका दीपांजली वळवी यांनी आदिवासी भाषेतून आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता नववीतील विद्यार्थिनी मानवी पाटील, ध्रुवी रत्नाकर, प्रियल बारी आणि कार्तिकी पाटील यांनी क्रांती दिनानिमित्त आपले विचार मांडले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी आरोही वळवी, लक्ष्मी पावरा तसेच विद्यार्थी ॲलेक्स गावित यांनी आदिवासी जीवन व संस्कृती याविषयी मनोगत व्यक्त केले. इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी लावण्या पाटील, हितीशा वळवी, मृण्मयी गायकवाड आणि गेहना गेही यांनी आपल्या मनोगतातून आदिवासी समाजाचे जीवन, परंपरा आणि संस्कृती यांवर प्रकाश टाकला.
यावेळी शाळेचे प्राचार्य पराग पोळ यांनी जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, जीवनपद्धती आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान यांची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
यानिमित्ताने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चित्रकला स्पर्धा, मातीच्या कलाकृतींचे प्रदर्शन, मुखवटा निर्मिती स्पर्धा, वेशभूषा सादरीकरण आणि पारंपरिक पोशाख स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच आदिवासी समाजातील पारंपरिक शस्त्रे, राहणीमान, खानपान आणि जीवनशैली यांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुलश्री वानखेडे आणि निशिका मराठे यांनी केले. शिक्षिका कुशल मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ. फरहाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागातील शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी शिक्षक आशिष वळवी यांनी विशेष सहकार्य केले.



