*22 उपसा जलसिंचन योजनांच्या कामात सातत्याने दिरंगाई होत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याबाबत, 3 ऑगस्ट रोजी अधीक्षक अभियंता शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार राहुल पाटी
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*22 उपसा जलसिंचन योजनांच्या कामात सातत्याने दिरंगाई होत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याबाबत, 3 ऑगस्ट रोजी अधीक्षक अभियंता शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार राहुल पाटी
*22 उपसा जलसिंचन योजनांच्या कामात सातत्याने दिरंगाई होत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याबाबत, 3 ऑगस्ट रोजी अधीक्षक अभियंता शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार राहुल पाटील व सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल विभागातील सर्व प्रमुख अधिकारी तसेच नंदुरबार जिल्ह्यातील 22 उपसा योजनेतील सर्व पदाधिकारी यांची आढावा बैठक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-22 उपसा जलसिंचन योजनांच्या कामात सातत्याने दिरंगाई होत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याबाबत, 3 ऑगस्ट रोजी अधीक्षक अभियंता शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार राहुल पाटील व सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल विभागातील सर्व प्रमुख अधिकारी तसेच नंदुरबार जिल्ह्यातील 22 उपसा योजनेतील सर्व पदाधिकारी यांची आढावा मीटिंग घेण्यात आली, याप्रसंगी निवेदन सादर करण्यात आले यावेळी उपसा सिंचन योजनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या प्रयत्नाने चेअरमन दीपक पाटील यांनी गेल्या बारा वर्षापूर्वी सदर योजनेसाठी निधी मिळावा याकरिता सातत्याने प्रयत्न केला व त्यांना यश मिळाले. धुळे व नंदुरबार जिल्हयामध्ये सातत्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती असते, त्याची जाणीव ठेवून शेतकऱ्यांना उभारलेल्या बॅरेजमधून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी मिळाल्यास, शेतकरी सुखी होईल व शासनाला देखील त्याचा फार मोठा फायदा होईल. या हेतूने या प्रकल्पास शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला, परंतु या निधीच्या विनियोग योग्य वेळी योग्य पद्धतीने होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आजपर्यंत अनेक बैठका आणि मिटींगा झाल्या, परंतु त्यातून कोणताही ठोस निर्णय निघाला नसून एकही योजना इतक्या वर्षांमध्ये सुरू होऊ शकली नाही, हे प्रशासन अपयशी ठरले हे फार मोठे दुर्दैव आहे, परंतु इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हील विभाग यांच्यात कुठलाही ताळमेळ नाही. त्यामुळे या योजनांना विलंब होत आहे. याबाबत आम्ही अनेक मिटिंगांमध्ये ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे की यां तिन्ही विभागात कोणीतरी समन्वयक म्हणून काम केले तरच या योजना पूर्णत्वास येतील. अन्यथा या योजनांचे पुढील वीस वर्षे देखील काम होणार नाही याची आम्हा शेतकऱ्यांना खात्री झालेली आहे. आपण लक्ष द्या साहेब जवळपास 80 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. त्या मानाने एकही उपसा योजना चालू झाली नाही हे केवढे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. एकीकडे दोन्ही जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे, दुबार पेरणीची लोकांवर संकट आलेले आहे. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांना डोळ्यासमोरून पाणी वाहून जात असताना दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या शेताला ते पाणी मिळत नसेल तर किती मोठे संकटाला तोंड शेतकरी देत आहे याची कोणीही जाणीव ठेवत नाही. आपणाकडून एवढीच अपेक्षा आहे की, याबाबत कोणीतरी दैनंदिन एका अधिकाऱ्याने सूक्ष्म नियोजन करण्यासाठी त्यांची नियुक्ती करणे आवश्यकता आहे व त्याची तशी नेमणूक करावी की त्यांनी दैनंदिन 22 योजनांची कोणत्या योजनेस आज काय काम आहे, कोण काय काम करणार आहे, याबाबत विचारपूस केली पाहिजे तरच अंकुश येईल व तिन्ही विभागांना समन्वय साधणारा एखादा अधिकारी नेमावा की, जेणेकरून त्यांना सांगून त्या योजनेवर कोणते काम प्रायॉरिटीने केले पाहिजे आणि कोणते काम नंतर केले पाहिजे अशी जाणीव ठेवून काम करणारा अधिकारी नेमून द्यावा व सर्व योजनांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याशी संपर्क साधण्याची एक योजना तयार करावी, अशी सर्व आमच्या शेतकरी बांधवांकडून आपणास विनंती आहे. सदर कामात प्रगती झाली नाही साहेब तर आम्हांला नाईलाजास्तव तापी नदीवर जलसमाधी आंदोलन करण्यासाठी भाग पडेल आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील. याबाबत आम्ही आपल्या सूचनांचे किती पालन होते याकडे लक्ष ठेवून आहोत आणि आपण शेतकऱ्यांना निराश करणार नाहीत याची आम्हांला थोडी खात्री वाटते. तरी आपण या कामात खरे उतरावे व शेतकऱ्यांच्या आशीर्वाद घ्यावा आपल्या कारकिर्दीत या कामांना वेग येईल, अशी नवी दिशा मिळावी ही अपेक्षा व्यक्त करीत आहोत.



