*नंदुरबार येथील माळीवाडा परिसरातील संत सावता महाराज मंदिर येथे, संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने,संगीतमय श्रीमद् भागवत कथा व कीर्तन सप्ताहाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील माळीवाडा परिसरातील संत सावता महाराज मंदिर येथे, संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने,संगीतमय श्रीमद् भागवत कथा व कीर्तन सप्ताहाचे आयोजन*
*नंदुरबार येथील माळीवाडा परिसरातील संत सावता महाराज मंदिर येथे, संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने,संगीतमय श्रीमद् भागवत कथा व कीर्तन सप्ताहाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील माळीवाडा परिसरातील संत सावता महाराज मंदिर येथेसंत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने संगीतमय श्रीमद् भागवत कथा व कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्या अंतर्गतदैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे नियोजन आहे. दिनांक 5 ऑगस्ट 2026 बुधवार रोजी दुपारी दोन वाजता बोडरे गल्ली माळीवाडा येथून श्रीमद् भागवत कथा ग्रंथचे विधिवत पूजन करून टाळ मृदंग गजर करत, संत सावता महाराज मंदिरात भागवताचार्य हेमंत पाठक महाराज संगीतमय भागवत कथा सप्ताह भर दररोज दुपारी 2 ते 5 निरूपण करतील तसेच दिनांक 5 ऑगस्ट 2026 बुधवार पासून दिनांक 11 ऑगस्ट 2026 मंगळवार पर्यंत सप्ताभर दररोज रात्री 8 वाजता आळंदी येथील प्रशिक्षित कीर्तनकार महाराज किशोर महाराज मोरदडकर दिनेश महाराज कंचनपुरकर दिपाली महाराज मोरदडकर शुभम महाराज मंदाने कर शैला महाराज धुळे अवधकर कामिनी ज्ञानेश्वर महाराज नंदुरबार कर तसेच संजय महाराज गल वाडेकर प्रकाश पुरी महाराज निरंजनी आखाडा धीरजगावहे राष्ट्रभक्ती. व्यसनमुक्ती वृक्षारोपण पर्यावरण संरक्षण बेटी बचाव बेटी पढाव नारी शक्ति आणिआध्यात्मिक भक्ती याविषयी प्रबोधनज्ञानदान करणार आहेत. या दरम्यान कीर्तनकारांना गायनाचार्य श्रावण महाराज अकराळेकर आदिनाथ महाराज जळकेकर भगवान महाराज जळकेकर बाल कीर्तनकार रोहित माळी नंदुरबारकर मृदंगाचार्य पुंडलिक महाराज वाडीकर विणेकरी परविन महाराज पाटील भालेरकर ही मंडळी साध संगत करतील तसेच संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी रोजी मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी आठ वाजेपासून संत शिरोमणी सावता महाराज यांचे पालखीतून संपूर्ण माळीवाडा परिसरात टाळ मृदुंग वाजंत्री सहमिरवणूक निघेल त्यानंतर महाप्रसाद भंडारा वाटपकार्यक्रम आयोजित करण्यात येईल तरी या ज्ञानअमृतमय अध्यात्मिक कार्यक्रमाच्या नंदनगरी परिसरातील भाविक बंधू भगिनींनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक संत सावता महाराज मंदिर समिती व समस्त माळी समाज नंदुरबार यांच्या तर्फे करण्यात आले आहे.



