*वडदहसोळमध्ये गवारेड्यांचा धुमाकूळ; लावणी केलेली भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वडदहसोळमध्ये गवारेड्यांचा धुमाकूळ; लावणी केलेली भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त*
*वडदहसोळमध्ये गवारेड्यांचा धुमाकूळ; लावणी केलेली भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे वडद हसोळ, पळसमकर वाडी येथे गवारेड्यांच्या कळपाने घुसून नव्याने लावलेल्या भातशेतीची भीषण नासधूस केली. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असताना शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पाण्याचा उपसा व साठवणूक करून अवघ्या आठ दिवसांपूर्वी शेतीची लावणी केली होती. मात्र, गवारेड्यांच्या या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पळसमकर वाडीतील स्थानिक शेतकरी संदीप विठ्ठल पळसमकर अजित पळसमकर यांच्यासह परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या शेतात काल रात्री गवारेड्यांचा कळप शिरला. गवेरेड्यांनी संपूर्ण पिकाची तुडवातुडव करून लावणी उध्वस्त केली. केवळ भातशेतीच नव्हे, तर शेतकऱ्यांनी कष्टाने लावलेली काजूची झाडे देखील गवेरेडे मुळासकट उपटून फेकत आहेत.
शेतकऱ्यांपुढे संकटांची मालिका:
एकीकडे यंदा पावसाने ताण दिल्याने 'पाऊस पडेल की नाही' या चिंतेत शेतकरी आहेत. त्यातच खतांचा तुटवडा आणि महागडी औषधे यामुळे शेतीचा खर्च वाढला आहे. अशा कठीण परिस्थितीत कसाबसा पाण्याचा उपसा करून लावलेली पिके गवारेडे उध्वस्त करत आहेत. शेतात थोडेफार पीक उरले तरी पुढे माकडांचा धोका कायम असतो. त्यामुळे "कोकणातील शेतकऱ्यांनी नक्की करायचे काय आणि आमच्या पाठीशी कोणी वाली आहे की नाही?" असा संतप्त आणि हताश सवाल स्थानिक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप: वनविभाग आणि स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती यांसारख्या प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.वनविभागाने तात्काळ या भागातील नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी वडाद हसोळ परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.



