*आडगांव येथील ग्रामसेविकाची तात्काळ बदली करा, गटविकास अधिकारी यांना निवेदन; कामात अनियमितता व नियमित अनुपस्थितीचा ग्रामसेविकावर आरोप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आडगांव येथील ग्रामसेविकाची तात्काळ बदली करा, गटविकास अधिकारी यांना निवेदन; कामात अनियमितता व नियमित अनुपस्थितीचा ग्रामसेविकावर आरोप*
*आडगांव येथील ग्रामसेविकाची तात्काळ बदली करा, गटविकास अधिकारी यांना निवेदन; कामात अनियमितता व नियमित अनुपस्थितीचा ग्रामसेविकावर आरोप*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामसेविका सौ. सूर्यवंशी यांची बदली करून दुसरे ग्रामसेवक नियुक्त करा व नियुक्ती आदेश मिळाल्यापासून ग्रामपंचायत आडगाव गावात किती दिवस हजर होते याचा खुलासा करावा, अशी मागणी बिरसा फायटर्स गाव शाखा आडगाव यांच्या कडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आमच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सौ. सूर्यवंशी या नियमितपणे गावात उपस्थित राहत नाहीत, त्यामुळे ग्रामपंचायतीची अनेक कामे प्रलंबित राहतात व नागरिकांना वारंवार कार्यालयाचे फेरे मारावे लागतात. ग्रामस्थांनी अनेक वेळा तोंडी विनंती करूनही त्यांच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झालेली नाही. ग्रामपंचायतीची प्रशासकीय कामे, दाखले, विविध शासकीय योजनाचे प्रस्तात तसेच नागरिकांची इतर कामे वेळेत होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच, सौ. सूर्यवंशी यांना ग्रामपंचायत आडगाव येथे नियुक्ती आदेश मिळाल्यापासून त्यांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायत कार्यालयात किती दिवस हजेरी लावली याचा अधिकृत खुलासा करण्यात यावा. नियुक्ती आदेश मिळूनही त्या नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहत नसल्याबाबत सविसर चौकशी करून संबंधित उपस्थिती नोंदवही (Attendance Register) व इतर अभिलेखांची पडताळणी करण्यात यावी. त्यामुळे आपण या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून, ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता सौ. सूर्यवंशी यांची बदली करून त्यांच्या जागी नियमितपणे गावात उपस्थित राहून जबाबदारीने काम करणारे ग्रामसेवक नियुक्त करावेत, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.



