*शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिर, नंदुरबार येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गणित स्पर्धा परीक्षा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिर, नंदुरबार येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गणित स्पर्धा परीक्षा संपन्न*
*शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिर, नंदुरबार येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गणित स्पर्धा परीक्षा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित, शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिर, नंदुरबार येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित गणित स्पर्धा परीक्षा संपन्न. 31 जुलै रोजी" लोकमान्य टिळक पुण्यतिथी" निमित्त गणित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण व्हावी, गणितातील मूलभूत संकल्पना दृढ व्हाव्यात तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला आणि विचार शक्तीला चालना मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील प्रश्न विद्यार्थ्यांच्या गणित विषयातील मूलभूत ज्ञान व संकल्पनांवर आधारित बहुपर्यायी स्वरूपाचे (MCQ) होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाची चाचणी घेण्याबरोबरच गणिताकडे आनंददायी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळाली. परीक्षा कालावधीत एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डी. के. मराठे, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री डॉ. गिरीश पवार सर , शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार यांनी परिक्षा हॉलला भेट देऊन पाहणी केली व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर परीक्षेला इयत्ता 1 ली च्या वर्गातून 102, इयत्ता 2 री च्या वर्गातून 148, इयत्ता 3 री च्या वर्गातून 108, इयत्ता 4 थी च्या वर्गातून 127 असे एकूण 485 उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील सुनिल खैरनार माध्यमिक विभागाचे गणित शिक्षक नितीन पाटील, सुयोग शिंपी अनसार शेख, किरण डेहनकर, राजेंद्र पाटील, योगेश पाटील, महेंद्र गिरासे, श्रीराम मगर तसेच स्पर्धेच्या आयोजनासाठी प्राथमिक विभागाचे सर्व सहकारी शिक्षक -शिक्षिका भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले.
परीक्षेचे पर्यवेक्षण श्रीमती तरूलता ठाकरे, श्रीमती दिव्या पवार, श्रीमती कविता ठाकरे, श्रीमती दिपाली पाटील, श्रीमती रंजीता वसावे, श्रीमती मोनिका नेरे, हेमकांत धनगर, श्रीमती प्रणाली बोरकर, अनिल खलाने, श्रीमती पुनम बागुल, श्रीमती अंकिता पाटील, अनसार शेख, निलेश पाटील यांनी केले. एकलव्य विद्यालयाचे पर्यवेक्षक टिका पाडवी, गणित मंडळ प्रमुख कल्पेश तांबोळी, नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज गणित परीक्षा यशस्वीपणे संपन्न झाली.



