*स्वतः च्या खाजगी वाहनावर लाल रंगात पोलीस पाटी लावली तर खबरदार-अपर पोलीस महासंचालक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वतः च्या खाजगी वाहनावर लाल रंगात पोलीस पाटी लावली तर खबरदार-अपर पोलीस महासंचालक*
*स्वतः च्या खाजगी वाहनावर लाल रंगात पोलीस पाटी लावली तर खबरदार-अपर पोलीस महासंचालक*
मुंबई(प्रतिनिधी):-स्वतः च्या खाजगी वाहनावर पोलीस नावाची लाल पाटी लाऊन फिरणार्या पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश डॉ. सुनील भारद्वाज पोलीस अधीक्षक अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) मुंबई यांनी दिले. या पुढे पोलीस असी पाटी लावणार्यांना पोलीस पाटी काढावी लागणार.
राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी, अंमलदार, तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आपल्या खाजगी वाहनावर पोलीस असी लाल रंगाची पाटी अथवा पोलीस लाल अक्षरात लिहून त्यांचे खासगी वाहन वापरत असतात. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे. यावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून या बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस पाटी असल्याने ते वाहन चेक होत नाही, पार्किंग लागत नाही, टोल लागत नाही. तसेच हे वाहन चेक होत नसल्याने कोणतेही अवैध काम होतात. गैर प्रकारही होतात. पण असा वाहनावर निर्बंध घालून पोलीस नावाची पाटी लावणार्या चालकाविरुद्ध कार्यवाही करण्यास गंभीरतेने दखल घेतली जात नव्हती. म्हणुन माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा सखाराम कुलकर्णी यांनी 27 जुलैला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रारीचे निवेदन देऊन पोलीस नाव लिहिण्यास निर्बंध घालण्याची विनंती केली. या निवेदनाची दखल घेऊन अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) मुंबई कार्यालयाने दखल घेऊन डॉ. सुनील भारद्वाज पोलीस अधीक्षक यांनी 31 जुलैला कार्यवाही करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक, महामार्ग अधीक्षक व सर्व पोलीस आयुक्त यांना दिले. पोलीस पाटी अथवा पोलीस नाव लिहिलेले वाहन आढळून आल्यास त्यांचे विरुद्ध कलम 133(6) महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 सह कलम 177 मोटार वाहन कायदा 1988 अन्वये उचित कार्यवाही करण्यात यावी असे आदेशात नमूद केले आहे.



