*नंदुरबार राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने, बोरद ते प्रकाशा रत्यावर, बोरद शिवार येथे मध्यप्रदेश राज्य निर्मित व विक्रीस असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या मद्यसाठ्याची
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने, बोरद ते प्रकाशा रत्यावर, बोरद शिवार येथे मध्यप्रदेश राज्य निर्मित व विक्रीस असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या मद्यसाठ्याची
*नंदुरबार राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने, बोरद ते प्रकाशा रत्यावर, बोरद शिवार येथे मध्यप्रदेश राज्य निर्मित व विक्रीस असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या मद्यसाठ्याची वाहतुक करतांना, महिंद्रा बोलेरा मॅक्स वाहनासह, 23 लक्ष 6 हजार 820 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक नंदुरबार यांनी बोरद ते प्रकाशा रत्यावर,बोरद शिवार येथे मध्यप्रदेश राज्य निर्मित व विक्रीस असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या मद्यसाठ्याची वाहतुक करतांना महिंद्रा बोलेरा मॅक्स वाहनासह एकुण 23 लक्ष 6 हजार 820 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे,
30 जुलै 2026 रोजी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबई राजेश देशमुख, सह आयुक्त दक्षता व अंमलबजावणी, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क, मुंबइ, पी.पी.सुर्वे, विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग नाशिक श्रीमती यु.आर.वर्मा, प्र. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार अ.सो. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली,
मिळालेल्या गोपनिय माहिती च्या आधारे एक महिंद्रा बोलेरो मॅक्स वाहन तिच्या परिवहन क्र. GJ- 31 U-0850 मधुन अवैध्येरीत्या मध्यप्रदेश निर्मित व विक्रीसाठी असलेल्या मद्यसाठ्याची मध्यप्रदेशातुन गुजरात राज्याचा दिशेने वाहतूक होणार आहे. अशी बातमी मिळाल्यावरून निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक नंदुरबार. व्हि.ए. चौरे. व स्टॉफ़ यांनी बोरद ते प्रकाशा रस्त्यावर, बोरद शिवार ता. तळोदा जि. नंदुरबार येथे सापळा रचुन अवैध्य परराज्यातील वाहतुक करतांना संशयित महिंद्रा बोलेरो मॅक्स येतांना दिसल्यावरुन अडवुन तपासणी केली असता त्या महिंद्रा बोलेरो मॅक्स मध्ये गोवा व्हिस्की चे 180 मि.ली क्षमतेचे एकुण 180 बॉक्स (9000), माउंट 6000 सुपर स्ट्रॉग बियर चे 500 मि. ली. क्षमतेचे एकूण 15 बॉक्स. (एकूण 360 पत्री टीन), लंडन प्राईड प्रिमियम व्हिस्कीचे 180 मि.ली क्षमतेचे एकुण 250 बाटल्या (एकुण 5 खोके) असे एकूण 200 बॉक्स गुन्ह्याचा मुद्देमाल मिळुन आला असुन, एक महिंद्रा बोलेरा मॅक्स वाहन तिच्या परिवहन क्र. GJ- 31-0850 वाहनासह एकुण 23 लक्ष 6 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक महिंद्रा बोलेरा मॅक्स वाहन ताब्यात घेण्यात आले असुन सदर वाहन चालक सांवरमल भेरुलाल बैरवा रा. केसरपुरा, राणास ता. रायपुर जि. भिलवाडा, राजस्थान यास अटक करण्यात आली. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदरची कार्यवाही निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार व्हि. ए. चौरे, तसेच दु. निरीक्षक एम. के. पवार सहा, सहा. दु. निरीक्षक बी. डी. बागले व जवान सर्वश्री, भुषण चौधरी. डी. एस.पाटील, आर. एन. पावरा, हर्षल पाटील, हर्षल शेवाळे, यांनी सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार
व्हि.ए.चौरे. हे करीत आहेत.
जनतेस आवाहन करण्यात येते की, अवैध्य मद्य निर्माती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाचा टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ वर संपर्क साधावा.



