*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अक्कलकुवा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात संयुक्तपणे साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अक्कलकुवा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात संयुक्तपणे साजरी*
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अक्कलकुवा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात संयुक्तपणे साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अक्कलकुवा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात संयुक्तपणे साजरी करण्यात आली. संयुक्त कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदार संघांचे आमदार आमश्या पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ एन. डी. भामरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. दिनेश खरात, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. पाटील, राज खरात, जगदीश पवार, इंजि. वैभव खरात तर प्रमुख वक्ते म्हणुन प्रा. अनिल बाविस्कर उपस्थित होते. सर्व प्रथम आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी प्रा. अनिल बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी जान्हवी खरात ह्या विद्यार्थिनीने महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनाला वाचन प्रेरणा दिवस जाहीर केल्यामुळे या दिवसाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आर. जी. काकुस्ते यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. दिनेश खरात यांनी मानले. तसेच मणिलक्ष्मी नगर येथील आमदार कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड. एल. एम. पाडवी, प्रा. डॉ. दिनेश खरात, दलित समाज अध्यक्ष बापू महिरे, कृष्णा साळवे, इम्रान पठाण, जगदीश पवार, सरपंच रविंद्र पाडवी, शहर प्रमुख रविंद्र चंदेल, मोरांबा सरपंच जेहरसिंग पाडवी, भावेश पाडवी, कृऊबा समितीचे संचालक टेडग्या वसावे आदी उपस्थित होते.



