*नंदुरबारातील करण चौफुली येथे देशी विदेशी दारू कब्जात बाळगून,गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी दोघांना पकडले
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारातील करण चौफुली येथे देशी विदेशी दारू कब्जात बाळगून,गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी दोघांना पकडले
*नंदुरबारातील करण चौफुली येथे देशी विदेशी दारू कब्जात बाळगून,गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी दोघांना पकडले*
नंदुरबार(प्रतिनिधी):-1 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील करण चौफुली येथे दोन इसम देशी विदेशी दारू कब्जात बाळगून, गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार, नंदूरबार उपविभागीय पोलिस अधिकारी गायकवाड यांनी पथक तयार करून, मिळालेल्या बातमीची खात्री करणे कामी , पोलीस पथक पाठवून बातमीची खात्री केली असता, तेथे दोन इसम देशी-विदेशी दारू कब्जात बाळगून मिळून आले, त्यानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 716/2026, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यातील आरोपी आयुष राजेश तिळंगे राहणार कंजरवाडा नंदुरबार, लखन कन्हैयालाल बखत्यापुरी राहणार सिंधी कॉलनी नंदुरबार यांच्या कब्जात 92 हजार 944 रुपये किमतीचा देशी -विदेशी दारू असा मुद्देमाल मिळून आला, त्याअनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोसई प्रमोद वंजारी, हेड कॉन्स्टेबल प्रदीप बाविस्कर, राकेश मोरे, सलीम शेख, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र रायपुरे, देवीदास दाभाड़े यांनी केली आहे.



