*सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त नंदुरबार येथे धर्मसंस्कृती जागृतीचा संदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त नंदुरबार येथे धर्मसंस्कृती जागृतीचा संदेश*
*सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त नंदुरबार येथे धर्मसंस्कृती जागृतीचा संदेश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला धारेश्वर येथील स्वामी सुभेदानंद महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनातून धर्म, राष्ट्र आणि भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी संस्कारक्षम पिढी घडविण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना स्वामी सुबोधानंद महाराज यांनी भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी घराघरांतून धर्माच्या प्रथा, परंपरा आणि संस्कार बालकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे सांगितले. माता-भगिनींनी आपल्या मुलांमध्ये धर्म, संस्कृती आणि राष्ट्रनिष्ठेचे संस्कार रुजवून धर्माधिष्ठित व संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात डॉ. सतीश बागुल यांनी ‘रामराज्य आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष व साधना’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. रामराज्याची संकल्पना, त्यामागील मूल्यव्यवस्था तसेच समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी आवश्यक असलेली साधना, संघटन आणि संघर्ष याविषयी त्यांनी विचार मांडले. या कार्यक्रमाला नंदुरबार परिसरातील शंभरहून अधिक हिंदू बांधवांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून धर्म, संस्कृती, राष्ट्रनिष्ठा आणि समाज जागृतीचा संदेश देण्यात आला.



