*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये शालेय व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक संघच्या सभा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये शालेय व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक संघच्या सभा उत्साहात संपन्न*
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये शालेय व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक संघच्या सभा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित कन्हैयालाल रवजीभाई पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी शालेय व्यवस्थापन समिती (SMC), पालक-शिक्षक संघ (PTA), सखी सावित्री समिती (SSS), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध व संरक्षण समिती (POCSO) तसेच इतर विविध शालेय समित्यांच्या सभा वेगवेगळया वेळेत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी उपस्थित होते. उपाध्यक्ष सिध्दार्थ वाणी, संचालिका सौ. केतकी वाणी, प्राचार्य डॉ छाया शर्मा, आणि पालक-शिक्षक संघाचे सचिव आशीष दातीर, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुधाकर चौधरी तसेच मोठ्या संख्येने पालक, शिक्षक व समिती सदस्य उपस्थित होते. सभेमध्ये विविध समित्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक समितीची भूमिका, जबाबदाऱ्या, उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. पालकांनीही विविध विषयांवर आपली मते व सूचना मांडून शाळेच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका व्यक्त केली. यावेळी अध्यक्ष किशोर वाणी यांनी पालकांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच नैतिक मूल्ये, शिस्त आणि सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वयाचे महत्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित पालक व शिक्षकांना नवीन ऊर्जा आणि दिशा मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व समित्यांची कार्ये, अहवाल व आगामी वर्षासाठीचे नियोजन एकमताने मंजूर करण्यात आले. सभेचे यशस्वी आयोजन शाळा प्रशासन, शिक्षकवृंद आणि समिती सदस्यांच्या सहकार्याने पार पडले.



