*घाटकोपर पूर्वेकडील मनपाच्या राजावाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घाटकोपर पूर्वेकडील मनपाच्या राजावाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर*
*घाटकोपर पूर्वेकडील मनपाच्या राजावाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर*
मुंबई(प्रतिनिधी):-घाटकोपर पूर्व येथील मुंबई महानगर पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल (राजावाडी) मध्ये सीबीएसई बोर्डाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या पूर्व-प्राथमिक विभागातील ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शिक्षकांच्या कमतरतेमुळे गंभीर परिणाम होत आहे. 15 जुन ते अद्याप शाळा सुरु झाल्यापासून
या विभागातील वर्ग शिक्षक उपलब्ध नसल्याने एक दिवसाआड घेतले जात असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकांनी महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे आणि संघटक प्रकाश वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील हा गुंता तातडीने सोडवून शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मुख्याध्यापक, प्राध्यापक तसेच शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने अखेर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडे हे प्रकरण मांडण्यात आले. पालकांना त्यांची भेट घडवून आणण्याचे काम संघटक प्रकाश वाणी यांनी केले.
पूर्व-प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा भक्कम पाया असतो. त्यामुळे शिक्षकांच्या कमतरतेमुळे निर्माण झालेला हा गंभीर प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे यांनी केली आहे. विद्यार्थी वर्गासाठी वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.



