*'कोंडतिवरे' शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*'कोंडतिवरे' शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
*'कोंडतिवरे' शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
राजापूर(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोंडतिवरे या शाळेत'आषाढी एकादशी'चा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी काढली. "ज्ञानोबा -तुकाराम"च्या जयघोषाने शाळेचा परिसर भक्तिमय झाला. विद्यार्थ्यांनी अभंग, भारूड, भजन तसेच संतांच्या जीवनावरील मनोगते सादर केली. यावेळी शिक्षकांनी आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी परंपरा आणि संतांच्या शिकवणीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना संतांच्या विचारांचे आचरण करून प्रामाणिकपणा, शिस्त आणि सदाचार अंगीकारण्याचे आवाहन केले. या सुंदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. गायकवाड, रवंदे, राठोड, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



