*आ. डॉ. विजयकुमार गावित यांना मानणाऱ्या जिल्हाभरातील आदिवासी समाज बांधव व भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना, विजय चौधरी यांचा धिक्कार करून तीव्र निषेध,अक्कलकुवा त
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आ. डॉ. विजयकुमार गावित यांना मानणाऱ्या जिल्हाभरातील आदिवासी समाज बांधव व भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना, विजय चौधरी यांचा धिक्कार करून तीव्र निषेध,अक्कलकुवा त
*आ. डॉ. विजयकुमार गावित यांना मानणाऱ्या जिल्हाभरातील आदिवासी समाज बांधव व भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना, विजय चौधरी यांचा धिक्कार करून तीव्र निषेध,अक्कलकुवा तहसीलदार यांना निवेदन*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अज्ञात व्यक्तीकडून व्हायरल करण्यात आलेली कथित ध्वनिमुद्रित संभाषण समाज माध्यमातून प्रसारित झाली असून यामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी महामंत्री विजय चौधरी यांचे आणि नंदुरबार येथील एक सामाजिक कार्यकर्ता संदीप चौधरी यांचे छायाचित्र लावलेले असून या दोघांच्या आवाजात मोबाईल वरून चाललेला संवाद त्यास ऐकू येतो. त्या संवादात भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा खोटा आरोप शिवीगाळ करून केल्याचे स्पष्ट ऐकायला मिळते. नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार डॉ. विजयकुमार गावित यांना मानणाऱ्या जिल्हाभरातील आदिवासी जनतेचा उद्रेक निर्माण करणारा हा प्रकार अत्यंत निंदनीय तेवढाच संताप जनक आहे. याचे पडसाद आदिवासी जनतेतून उमटू शकतात. त्याचप्रमाणे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांना मानणाऱ्या भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच माजी खासदार डॉ हिना गावित यांनाही अतिशय अश्लील शब्दात शिवीगाळ करीत असल्याचे ऐकायला मिळते.
याबद्दल आ. डॉ. विजयकुमार गावित यांना मानणाऱ्या जिल्हाभरातील आदिवासी समाज बांधवांमध्ये व भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या असून विजय चौधरी यांचा धिक्कार करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा येथील तहसीलदार विनायक घुमरे यांना लेखी निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली असून प्रसंगी जन आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी, प्रताप वसावे,ॲड. सुधीर पाडवी, दिनकर पाडवी, जगदीश वसावे, किशोर पाडवी, दिलीप वसावे, भूपेंद्र पाडवी किसन नाईक, सुनील राव, नरेश पाडवी, बहादुरसिंग पाडवी, विजयसिंह पाडवी, भगतसिंग पाडवी ,मगन पाडवी, ब्रिजलाल पाडवी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होतेहोते.
दरम्यान, अक्कलकुवा येथे डॉ. विजयकुमार गावित समर्थकांनी निषेध बैठक घेऊन या निंदनीय प्रकाराबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त करीत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.



