*आषाढी एकादशीनिमित्त कृषिकन्यांकडून वृक्षदिंडीचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आषाढी एकादशीनिमित्त कृषिकन्यांकडून वृक्षदिंडीचे आयोजन*
*आषाढी एकादशीनिमित्त कृषिकन्यांकडून वृक्षदिंडीचे आयोजन*
पाचल(प्रतिनिधी):-संगमेश्वर तालुक्यातिल आरवली गावामध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधत शरद पवार कृषी महाविद्यालय, खरवटते-दहिवली येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कार्यरत कृषिकन्यांनी देव केदार विद्यालय, आरवली आणि जिल्हा परिषद केंद्रशाळा, आरवली क्रमांक 1 यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन केले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि कृषिकन्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या हातात पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचे संदेश देणारे आकर्षक फलक होते. "झाडे लावा, झाडे जगवा", "वृक्ष हेच जीवन", "हरित पृथ्वी सुरक्षित भविष्य" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून निसर्गसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. वृक्षदिंडी गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. या कार्यक्रमास देव केदार विद्यालय, आरवली आणि जिल्हा परिषद केंद्रशाळा, आरवली क्रमांक 1 येथील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच शरद पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या
मृण्मयी कोलते, चेतना बांडागळे, निकिता कोकरे, श्रावणी सनगरे, पूनम काळे
आरती पांढरे होत्या. पर्यावरणाबाबत जनजागृती घडवून आणणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. ह्या कार्यक्रमाने परिसरातिल जनतेलाआषाढी वारीचा संदेश देत आज सुद्धा संत तुकाराम महाराज आणि वारकरी समाज जो संदेश देत आहेत तो शाळेतही शाळकरी मुले जतन करत एक प्रकारे वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी हा संदेश आजू बाजूच्या परिसराला पोचवण्यात आला.



