*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात शास्त्रज्ञ व 'मिसाईल मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या विज्ञान, शिक्षण आणि राष्ट्रनिर्माणासाठीच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन ज्ञान, संशोधन, प्रामाणिकपणा आणि देशसेवेची भावना जोपासावी, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांनी सर्वांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनातून प्रेरणा घेऊन उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला.