*कुणबी युवा मुंबई आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी युवा मुंबई आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धा उत्साहात संपन्न*
*कुणबी युवा मुंबई आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धा उत्साहात संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा मुंबई यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात संघाचे उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर, सरचिटणीस कृष्णा वणे, सहचिटणीस माधव कांबळे, रवींद्र कुरतडकर तसेच युवा अध्यक्ष रामचंद्र पालकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि महापुरुष व समाजनेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. युवा सरचिटणीस सचिन रामाणे यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व पालकांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर विविध स्पर्धांना प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मान्यवर परीक्षकांनी स्पर्धकांच्या सादरीकरणाचे गुणांकन करून विजेत्यांची निवड केली. वक्तृत्व स्पर्धेचे निकाल प्रथम अद्विक पाडावे, द्वितीय – सिद्धार्थ मोठे, तृतीय विराज खांबे. उत्तेजनार्थ शौर्य कावणकर, वीर पांडुरंग दोडेकर व समीक्षा झुजम. निबंध स्पर्धेचे निकाल प्रथम सानिका मते, द्वितीय समर्थ कावणकर, तृतीय प्रथम जाधव. उत्तेजनार्थ श्रावणी ठोंबरे व निधी पाटील. चित्रकला स्पर्धेचे निकाल प्रथम साहिल दोडेकर, द्वितीय वीर दोडेकर, तृतीय श्रवण झुजम. उत्तेजनार्थ कनिष्का घाटबंदे, आराध्या अवेरे, श्रेयांशी रामाणे व काव्या रामाणे. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि लेखणी देऊन गौरविण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी संघटन, शिक्षण, व्यवस्था परिवर्तन आणि सामाजिक विचारधारा या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थी व पालक मंत्रमुग्ध झाले. यावेळी युवा अध्यक्ष युवराज संतोष उपाध्यक्ष अँड. महेश अंबावले, प्रतीक मिसाळ, सहचिटणीस बारकू बेंडल, पंकज पालकर, खजिनदार पांडुरंग दोडेकर, शशांक रांगळे, विष्णू राबाडे, सूर्यकांत गावणकर, अनिल अवेरे, कैलास गंभे, शैलेश दळवी, संदीप पाष्टे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सहचिटणीस पंकज पालकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



