*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
राजापूर(प्रतिनिधी):-शहरा नजीकच्या मौजे शीळ गावचे माजी सरपंच व शिवसेना नेते रविंद्र नागरेकर यांची डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. रविंद्र नागरेकर यांनी शीळ गावचे सरपंच त्याचबरोबर शिवसेना गटप्रमुख ते उप विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, टेलिफोन सल्लागार कमिटीवर सदस्य म्हणून तसेच केंद्र सरकार पंचायतराज कमिटी, जिल्हा दक्षता समाज कल्याण कमिटीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच केंद्रीय मंत्री प्रभू यांचे ते नऊ वर्षे प्रतिनिधी म्हणून राहिले आहे. राष्टीय व राज्य स्थरावर संस्था मध्ये काम केले आहे. तर मधल्या काळात काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हणून त्याचबरोबर जिल्हा स्वाभिमान संघटना अध्यक्ष आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष तसेच सरचिटणीस पदावर काम केले आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेवून पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत तसेच कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी त्यांची या समितीवर नियुक्ती केली आहे. या सदस्य पदाच्या माध्यमातून डोंगरी भागातील प्रलंबीत विकास कामांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे नागरेकर यांनी सांगितले. या नियुक्तीबद्दल त्यांचा राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित, राजापूर यांच्या वतीने संस्थेचे चेअरमन प्रकाश मांडवकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्हा. चेअरमन प्रकाश लोळगे, यांसह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते. उपस्थितांनी रविंद्र नागरेकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



