*शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात*
*शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शा. ज.नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे या सोहळ्यात वारकरी वेशभूषेत सहभाग नोंदवून संपूर्ण परिसर विठ्ठलमय करून टाकला. कार्यक्रम प्रसंगी सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील खैरनार, गटशिक्षणाधिकारी जे. ए.चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन. पाटील, डॉ. गिरीश पवार, प्रणाली बोरकर यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर 'ज्ञानोबा- तुकाराम' आणि 'विठ्ठल -विठ्ठल' च्या गजरात ही दिंडी गावात निघाली. दिंडी गावात फिरून पुन्हा विद्यालयाच्या प्रांगणात परतली. यानंतर विद्यालयाच्या मैदानात दिंडीचे मुख्य आकर्षण असलेला रिंगण सोहळा पार पडला. या उत्सवात विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. भक्ती आणि उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या या भव्यदिंडी सोहळ्याचे अतिशय आनंदात सांगता झाली.



