*शासनाच्या योजना एकाच छताखाली; 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा'ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदार शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शासनाच्या योजना एकाच छताखाली; 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा'ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदार शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष
*शासनाच्या योजना एकाच छताखाली; 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा'ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदार शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते भरत गावीत यांच्या हस्ते उद्घाटन; विविध विभागांच्या लाभार्थ्यांना दाखले व योजनांचा लाभ वितरित*
नवापूर(प्रतिनिधी):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री
स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त नवापूर नगरपालिकेच्या सुरूपसिंग नाईक टाऊन हॉल येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहात पार पडले. शासनाच्या विविध विभागांच्या योजना व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचे उद्घाटन नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसेच स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते भरत गावीत, उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी बी. ए. कापसे, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जालमसिंग गावीत, सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष राहुल गावीत, नगरपालिकेचे सभापती शरद पाटील, नगरसेविका मनिषा मावची, भाग्यश्री गावीत, नगरसेवक शिरीष प्रजापत, सी.ए. वतन अग्रवाल, नगरसेवक सोमित्र गावीत, अल्तमय खाटीक, मनोहर गावीत, तहसीलदार दत्तात्रय जाधव, गटविकास अधिकारी देविदास देवरे, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश मावची, सहाय्यक गटविकास अधिकारी किरण गावीत, कारखान्याचे व्हाइस चेअरमन छगन कोकणी, माजी उपनगराध्यक्ष फारुक शहा, शहराध्यक्ष सागर पाटील, माजी नगरसेवक विशाल सांगळे, तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी, मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील, वनक्षेत्रपाल अमोल काशीकर, गटशिक्षण अधिकारी रमेश देसले, अभियंता पवन नाईक, भाजप नेते सत्यपाल गावीत, माजी नगरसेवक जैनू गावीत, राजू आगळे, दिलीप पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय तसेच इतर शासकीय विभागांच्या विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना दाखले, प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे व विविध शासकीय लाभांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिकांची शासकीय कामे एकाच ठिकाणी, सुलभ व जलद गतीने पूर्ण झाली.
यावेळी आमदार शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक, ज्येष्ठ नेते भरत गावीत, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे तसेच उपविभागीय अधिकारी बी. ए. कापसे यांनी मनोगत व्यक्त करत शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. विविध विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना जलद, पारदर्शक व प्रभावी सेवा देण्याचे आवाहनही त्यांनी केले. शिबिरात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना योजनांची सविस्तर माहिती दिली, अर्ज स्वीकारले, आवश्यक मार्गदर्शन केले तसेच अनेक प्रकरणांचा जागेवरच निपटारा केला. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
यानंतर उपस्थित मान्यवरांनी विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या माहिती व सेवा स्टॉलची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाची माहिती घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले, तर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे आभार मानले.
विशेष म्हणजे, लाभ वितरणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला असला तरी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' नियोजित कालावधीपर्यंत सुरू राहणार असून, नागरिकांनी विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी शिबिराला भेट देण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



