*एकलव्य विद्यालयात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
*एकलव्य विद्यालयात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा जीवनप्रवास व त्यांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टीने एकलव्य विद्यालय येथे प्रतिमापूजन व व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख वक्ते प्रा. चंद्रकांत देसले यांनी स्व. अजित पवार यांच्या कामाची व्याप्ती व दांडगा जनसंपर्क व त्यांची सामान्य जनतेविषयी असलेली तळमळ याविषयी सविस्तर माहिती आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना दिली. स्वर्गीय अजित पवारांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वच राजकीय पक्षात त्यांची मजबूत पकड व वेगळी ओळख होती याचीही अनेक उदाहरणे देसले यांनी उपस्थित विद्यार्थी श्रोत्यांना सांगितली. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, पर्यवेक्षक टिका पाडवी प्रमुख वक्ते प्रा. चंद्रकांत देसले, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, सुनिल पाटील व कल्पेश तांबोळी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक मंडळाचे सदस्य राजेंद्र पाटील, अन्सार शेख, संभाजी गावीत यांनी विशेष परिश्रम घेतले. सुयोग शिंपी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर राहुल भावसार यांनी उपस्थितांचे आभार मानले.



