*विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि गरिबीमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये, या उदात्त हेतूने गंगामाई बहुउद्देशीय महिला मंडळ चोपडा जि जळगांव यांच्या वतीने वाचन, लेखन अभियान उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्याना मोफत बाल सचित्र उजळणी पुस्तक, पेन्सिल रबर आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्याच्या चेहृऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. वाचन लेखन अभियान या उपक्रमांतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आमली, खापरान, अमलीबारी गंगापूर, ठाणाविहीर, आमली पुनर्वसन, सावर, पिंपळगाव, गुलीआंबा या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बाल सचित्र उजळणी पुस्तके, पेन्सिल, रबर व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप गंगामाई बहुउद्देशीय महिला मंडळ या संस्थेचे सचिव व प्रतिनिधी तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे प्रतिनिधी डी डी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना अक्षर ओळख, वाचनाची आवड निर्माण होणे आणि लेखनाची आवड निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.



