*लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे विविध शाळांमध्ये विज्ञान कक्ष सुरु*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे विविध शाळांमध्ये विज्ञान कक्ष सुरु*
*लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे विविध शाळांमध्ये विज्ञान कक्ष सुरु*
कशेळी(प्रतिनिधी):-लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे ग्रामीण भागातील मुलांनी विज्ञानाची कास धरावी तसेच विज्ञान युगात प्रवेश करताना अडचण होऊ नये म्हणून मुलांना सुरुवातीपासून विज्ञानाची ओळख व आवड निर्माण व्हावी जेणेकरून सहज सुलभतेने विज्ञानाला सहज सामोरे जाता येईल या हेतूने मंडळांने यावर्षीच्या शैक्षणिक साहित्य वाटप दौऱ्यात लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवली नंबर 1 येथे मंडळाचे माजी चिटणीस कै. विजय दत्ताराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्ष तसे राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सुयोग विकास विद्यामंदिर कशेळी नं 5 येथे मंडळाचे माजी उपाध्यक्ष कै. गणपत गोविंद देवरुखकर यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्ष सुरू करण्यात आले याशिवाय लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पालू नंबर 1 येथे विज्ञान कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक विज्ञान कक्षासाठी पाठ्यपुस्तकाप्रमाणे आवश्यक ते सर्व विज्ञान साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र लोखंडी कपाट व विद्यार्थ्यांना अपरन साठी कापड देण्यात आले. तसेच सन 2022-23 मध्ये संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय दाभोळे येथे कै.नारायण दत्तात्रय धारप विज्ञान कक्ष तसेच राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शीळ नंबर 1 येथे कै. मोहन गोपाळ अरवंदेकर विज्ञान कक्ष सुरू करण्यात केलेले आहेत. या कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे सरचिटणीस मधुकर पवार, चिटणीस प्रशांत साळुंके, शंकर सुर्वे, सदस्य रीना भाताडे, साधना चव्हाण, अर्चना गुरव, अनंत जाधव, ॲड. अश्वनी कुमार मदन, डॉ.सुहास हलनकर, संतोष भुर्के, प्रकाश बाईत, विलास बने, रणजीत होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.



