*कु. स्नेहल संदीप परटवलकर हिचे NEET परीक्षेत उज्ज्वल यश मिळंद गावात होणार पहिली डॉक्टर* पाचल(प्रतिनिधी):- राजापूर तालुक्यातील मौजे मिळंद गावची सुकन्या स्नेहल संदीप परटवलकर हिने आपल्या कष्ट, जि
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कु. स्नेहल संदीप परटवलकर हिचे NEET परीक्षेत उज्ज्वल यश मिळंद गावात होणार पहिली डॉक्टर* पाचल(प्रतिनिधी):- राजापूर तालुक्यातील मौजे मिळंद गावची सुकन्या स्नेहल संदीप परटवलकर हिने आपल्या कष्ट, जि
*कु. स्नेहल संदीप परटवलकर हिचे NEET परीक्षेत उज्ज्वल यश मिळंद गावात होणार पहिली डॉक्टर*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील मौजे मिळंद गावची सुकन्या स्नेहल संदीप परटवलकर हिने आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मिळंद गावच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवला आहे कु. स्नेहल हिने नीट NEET परिक्षेत उज्ज्वल यश संपादन करुन डॉक्टर होण्याच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाचा आणि कठीण टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. मिळंद गावात अनेक शिक्षक, वकील, शासकीय उच्च अधिकारी, लेखक, गायक, समाजसेवक व पत्रकार घडले आहेत, आता कु. स्नेहल संदीप परटवलकर हिने NEET परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून मिळंद गावातील पहिली डॉक्टर होण्याचा मान मिळविण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. या यशामागे आदर्श शिक्षक संदीप परटवलकर, आणि संपूर्ण कुटुंबाचे मोलाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन व संस्कार आहेत, स्नेहलच्या अथक परिश्रमामुळे आणि दृढ निश्चयामुळे हे यश शक्य झाले आहे.
स्नेहल आपले पुढील शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून एक उत्कृष्ट, संवेदनशील व सेवाभावी डॉक्टर बनो आणि आपल्या परिसरातील गरजू व गरीब रुग्णांची सेवा तिच्या हातून घडो अशा शुभेच्छांचा वर्षाव तिच्यावर होत आहे. स्नेहलच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीस गावातील नागरिक, शिक्षकवर्ग,
युवा मंच, मिळंद, वर्तमान विशेषांक तसेच संपूर्ण मिळंद ग्रामस्थ
यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.



