*प्रधानमंत्री पथविक्रेता योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा- नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रधानमंत्री पथविक्रेता योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा- नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील*
*प्रधानमंत्री पथविक्रेता योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा- नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील*
देवळाली प्रवरा(प्रतिनिधी):-रस्त्यावर फिरून विविध छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांनी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपला व्यवसाय सक्षम करावा, असे आवाहन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील यांनी केले.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या लोककल्याण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्ष बेबी बर्डे, नगरसेवक प्रकाश संसारे, वसंत कदम, राजेंद्र लोखंडे, नगरसेविका सिंधू वाळूंज, मनीषा कदम, पुष्पा तांबे, चंदाराणी गाडे, आशा चव्हाण, सुवर्णा कोठुळे, सुजाता कदम, तसेच बँक ऑफ बडोदाचे अधिकारी अविनाश डाडर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे रामकृष्ण पराड, स्टेट बँकेचे शाखाधिकारी मुकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील म्हणाले की, कोरोना काळात सुरू करण्यात आलेली पीएम स्वनिधी योजना लघु व्यावसायिकांसाठी संजीवनी ठरली आहे. या योजनेला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कर्जाची नियमित परतफेड होत असल्याने केंद्र शासनाने या योजनेची मुदत सन 2030 पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे अधिकाधिक पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम करावा. तसेच बँकांनीही छोट्या व्यावसायिकांना सहकार्याची भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, नव्या पथविक्रेत्यांचा समावेश करणे, वित्तीय समावेशनास चालना देणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने विशेष मोहिमेअंतर्गत या लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बँक ऑफ बडोदाचे अधिकारी अविनाश डाडर यांनी पीएम स्वनिधी योजनेची सविस्तर माहिती देऊन लाभार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केले, तर आभार प्रदर्शन समुदाय संघटिका सविता हारदे यांनी केले. या मेळाव्यास विविध विभागांचे प्रमुख, लाभार्थी, महिला बचत गटांच्या सदस्य, सीआरपी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



